विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल

On: April 24, 2024 1:05 PM
Vickey Kaushal
---Advertisement---

Vickey Kaushal | बॉलिवूडचा स्टार अभिनेता विकी कौशल (Vickey Kaushal) अनेक कारणांसीठी चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत अनेक वास्तवदर्शी आशयाच्या चित्रपटांमधून काम केलंय. सध्या विकी कौशल (Vickey Kaushal) अनेक ठिकाणी स्पॉट होताना दिसतो. त्याने परिपूर्ण आपला पेहराव, लूक बदललेला दिसतो. त्याने आपल्या शरीराचीही खास काळजी घेतली आहे. लांब केस, दाढी, पिळदार शरीर या लूकमुळे विकी कौशल (Vickey Kaushal) अधिक चर्चेत आलाय. सध्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जीवनपट असून सिनेमाचं नाव हे ‘छावा’ आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरू असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

विकी कौशल (Vickey Kaushal) अनेक कार्यक्रमांना येत असतो. काही महिन्यात त्याच्या लूकमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. आधीचा विकी कौशल आणि एवढ्या सात ते आठ महिन्यांमधील विकी कौशलचे दाढी, केस, शरीर यामध्ये मोठा बदल झालेला दिसून येतोय. त्याने केलेलं ट्रान्सफॉर्मेशनचे तरूणांमध्ये चर्चा आहे. त्याने सध्या घोडेस्वारी, तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्या लूकमुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आतुर झालेत.

सोशल मीडियावर विकीचे फोटो व्हायरल

सध्या चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मोठे केस, दाढी, कपाळावरील टीळा, गळ्यात माळ… अशा त्याच्या दमदार लूकमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. लोकं त्याला पसंदी देताना दिसत आहेत. फोटोत आजूबाजुला जंगल दिसत असल्याने प्रशिक्षण करत असतानाचा सीन असावा असं बोललं जातंय. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत.

येसुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना

हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय. या बहुचर्चित चित्रपटात रश्मिका मंधना येसुबाईंची भूमिका करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालीये.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याआधी छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट पाहिलेत. संभाजी महाराज हे सुद्धा मोठे योद्धा होते. साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी योगदान दिलंय. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर अधारित आहे.

News Title – Vickey Kaushal As Chhatrapati Sambhaji Maharaj Role In Chaava Cinema

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाईक घ्यायची? तर भन्नाट फीचर्ससह ‘ही’ नवीन बाईक येतेय बाजारात

‘अमरावतीत हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?,संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

 

 

Join WhatsApp Group

Join Now