बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, सिनेसृष्टीत एकच खळबळ

On: October 25, 2025 4:26 PM
satish shah
---Advertisement---

Satish Shah | चित्रपट आणि दूरचित्रवाणी विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे आज, २५ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘साराभाई’चा ‘इंदू’ आणि विनोदाचा बादशाह –

सतीश शाह (Satish Shah) यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या प्रचंड गाजलेल्या मालिकेतील त्यांची ‘इंद्रवदन साराभाई’ उर्फ ‘इंदू’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचवले. या मालिकेतील त्यांचे आणि रत्ना पाठक शाह यांनी साकारलेल्या माया साराभाई यांच्यातील नोकझोंक प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

याशिवाय, १९८४ साली आलेल्या ‘ये जो है जिंदगी’ या सिटकॉममधील त्यांची कामगिरी अविस्मरणीय ठरली. या शोच्या ५५ भागांमध्ये त्यांनी तब्बल ५५ वेगवेगळी पात्रे साकारण्याचा विक्रम केला होता. ‘फिल्मी चक्कर’ या मालिकेतही त्यांनी रत्ना पाठक शाह यांच्यासोबत काम केले होते. ‘भगवान परशुराम’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या सतीश शाह यांनी ‘जाने भी दो यारों’ , ‘उमराव जान’ , ‘शक्ती’ अशा अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली.

किडनीच्या आजाराने घेतला बळी –

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश शाह (Satish Shah) हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी २:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या व्यवस्थापकाने इंडिया टुडे/आजतकशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयात असून, उद्या, २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

गुजरातच्या ,मांडवी येथे जन्मलेल्या सतीश शाह यांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेज आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे शिक्षण घेतले होते. १९७२ साली त्यांनी डिझायनर मधु शाह यांच्याशी विवाह केला होता. नुकतेच ज्येष्ठ जाहिरात गुरू पियुष पांडे यांचे निधन झाले होते, त्या धक्क्यातून सावरत असतानाच शाह यांच्या निधनाने इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे.

News Title – Veteran Actor Satish Shah Passes Away

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now