SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: December 11, 2023 12:36 PM
Share Market
---Advertisement---

मुंबई | आजच्या काळात गुंतवणुकीचे हजारो पर्याय आहेत. यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंडाची SIP. जर तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे गुंतवले, तर तुम्हाला नफा मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अशात म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

लवकरच छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात 250 रुपयाच्या मासिक SIP द्वारे गुंतवणूक करू शकतील. बिझनेस टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्याअध्यक्ष माधबी बुच यांनी याबाबत माहिती दिली.

भांडवली बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंड हाउसेससोबत 250 रुपयांची SIP आणण्यासाठी काम करत असून यामुळे अधिकाधिक लोकांना SIP योजनांशी जोडले जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

SIP गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही मोठी रक्कम गुंतवू नये. मोठी रक्कम गुंतवून भविष्यात पैशांच्या कमतरतेमुळे, तुमची एसआयपी खंडित होते आणि तुम्हाला कमी नफा मिळतो.

एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा प्रचंड आहे. म्हणूनच एसआयपी दीर्घकाळासाठी केली पाहिजे, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.

शेअर बाजारात चढ-उतारांची प्रक्रिया सुरूच असते, यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मंदी पाहून अनेक जण गुंतवणूक करणे थांबवतात. असे करू नका. अशावेळी बरेच शेअर्स स्वस्तात मिळतील. अशा परिस्थितीत गुंतवणूक करून, जेव्हा तेजी येते, तेव्हा गुंतवणुकीचा भरपूर फायदा मिळवता येतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

Dengue | काळजी घ्या! राज्यातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर

Vidyut Jamwal | ‘या’ अभिनेत्याने शेअर केले जंगलातील न्यूड फोटो!

Maratha Reservation | ‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन’; ‘या’ आमदाराची मोठी घोषणा

Uddhav Thackeray | शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर; ठाकरेंना पुन्हा धक्का

Weather Update | सुट्टीत फिरायचा प्लॅन करताय?, हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now