IPL च्या हंगामात वेंकटेश अय्यरने मारला सर्वात लांब षटकार; Video तुफान व्हयरल

On: March 30, 2024 12:53 PM
IPL 2024 Longest Sixes
---Advertisement---

IPL 2024 Longest Sixes l KKR ने IPL 2024 च्या काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा 7 गडी राखून पराभव केला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) फलंदाज व्यंकटेश अय्यरच्या षटकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्यंकटेश अय्यरने IPL 2024 च्या मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला आहे.

IPL 2024 Longest Sixes l व्यंकटेश अय्यरने मारला सर्वात लांब षटकार :

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फलंदाज व्यंकटेश अय्यरने काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात 106 मीटरचा षटकार ठोकला आहे. यासह व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2024 च्या मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला आहे.

व्यंकटेश अय्यरने मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनचा देखील विक्रम मोडला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 103 मीटरमध्ये षटकार ठोकला होता. यानंतर आंद्रे रसेलचा या मोसमात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 102 मीटर लांब षटकार ठोकला होता.

व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल :

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या नवव्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) फिरकी गोलंदाज मयंक डागर गोलंदाजी करायला आला. मयंक डागरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरने असा फटका मारला की चेंडू चिन्नास्वामी स्टेडियमच्या पलीकडे गेला. व्यंकटेश अय्यरचा हा षटकार 106 मीटर लांब होता.

व्यंकटेश अय्यरच्या या सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात व्यंकटेश अय्यरने 30 चेंडूत 50 धावांची खेळी केली. व्यंकटेश अय्यरच्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

https://twitter.com/i/status/1773756055316730050

IPL 2024 Longest Sixes l IPL 2024 मध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारे फलंदाज :

1. व्यंकटेश अय्यर – 106 मीटर

2. इशान किशन – 103 मीटर

3. आंद्रे रसेल – 102 मीटर

४. अभिषेक पोरेल – 99 मीटर

5. ट्रॅव्हिस हेड – 95 मीटर

News Title : Venkatesh Iyer smashes monstrous 106-meter six against RCB

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांनो… सी लिंकवर प्रवास करणे महागले, टोल शुल्कात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका!

चाणक्याचे ‘हे’ 5 मंत्र फॉलो करा; व्यवसायात येईल भरभराटी!

अखेर विराट- गौतमचे झाले पॅच अप! मिठी मारून दिल्लीकरांची मने जिंकली

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now