“कोण पृथ्वीराज चव्हाण?, मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो”

On: April 24, 2024 5:04 PM
---Advertisement---

Prakash Ambedkar | मविआसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedka) यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यातील युती होता होता राहिली. आता यावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedka) यांनी एका मुलाखतीत बोलताना भाष्य केलं आहे.

जागावाटपावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कोण पृथ्वीराज चव्हाण? मी त्यांच्याशी का बोलू?, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

कोण पृथ्वीराज चव्हाण?- प्रकाश आंबेडकर

कोण पृथ्वीराज चव्हाण? मी का त्यांच्याशी बोलायचं? मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावं, काय अधिकारी आहेत त्यांच्याकडे? त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलावे, असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेत.

काँग्रेस हायकमांडशी मी काय बोलावं? त्यांनाच आम्ही नको होतो. आज काँग्रेस पक्षाला इतर पक्षांची साथ मिळत नाही. नितीश कुमार यादव, ममता बॅनर्जी हे साथ सोडून का गेले, याचा विचार काँग्रेस पक्षाने केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

काँग्रेस पक्षाला जिंकायचंच नाही कारण त्यांच्या मागे ईडी, सीबीआय आहे. मी त्यांच्यासोबत बोलणी करत होतो, तेव्हा मी म्हणालो तुम्ही खर्गेंच्या बाजूने सर्वांना एकत्र करताय पण राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) बाजूने पार्टी उध्वस्त करत आहात. तुम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करताय, ते ही निवडणूकीच्या तोंडावर, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

आंबेडकरांना चव्हाणांचं प्रत्युत्तर

मी कधीच म्हणालो नाही की प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत बसावं आणि चर्चा करावी. मी कायम म्हणालो की आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आणि प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करा. प्रकाश आंबेडकर सोबत आले पाहिजे होते, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र ते स्वतःच आले नाहीत, असं पृथ्वीराज चव्हांणांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

भाड्याचे कपडे घेऊन बॉलीवुड स्टार करतात स्टायलिंग; प्रसिद्ध अभिनेत्याने केली पोलखोल

‘बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून ..’; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

“पुन्हा तुझं थोबाड दाखवू नकोस”, चेन्नईच्या गोलंदाजावर चाहते भडकले

सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now