श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल

On: April 20, 2023 2:33 PM
---Advertisement---

मुंबई | मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या एका डान्समुळे ते चर्चेत आले आहेत. पुष्पा (Pushpa) सिनेमातील श्रीवल्ली या गाण्यावर वसंत मोरे थिरकताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पुष्पा या सिनेमातील श्रीवल्ली गाण्यावर वसंत मोरे (Vasant More) यांनी खास पुष्पा स्टाईल डान्स केला. मग काय मोरे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला नसता तर नवलच.

या व्हिडिओमध्ये वसंत मोरे (Vasant More) यांचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळतोय. अंगात हुडी, डोळ्याला गॉगल, हातात उपरणं घेऊन पुष्पाचा नायक अल्लू अर्जुन प्रमाणे वसंत मोरे नृत्य करताना दिसत आहेत.

14 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. या व्हिडीओला मोरे यांचे चाहते लाइक्स करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now