लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वसंत मोरेंनी केली मोठी घोषणा!

On: March 22, 2024 10:53 AM
Vasant More will contest as an independent in Pune Loksabha
---Advertisement---

Pune Loksabha | मनसेला रामराम ठोकल्यापासून वसंत मोरे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलं गेलं. यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतल्यापासून त्यांच्या उमेदवारीबाबत बोललं जात होतं.

वसंत मोरे हे मविआकडून लढणार, अशी चर्चा असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुण्यातून वसंत मोरे आता अपक्ष म्हणून लढत देणार आहेत.

महाविकास आघाडीने येथे काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून भाजपाच्या मुरलीधर मोहोळ हे उमेदवार असणार आहेत. आता वसंत मोरे यांची थेट लढत ही धंगेकर आणि मोहोळ यांच्याशी असणार आहे.

वसंत मोरे अपक्ष लढणार

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. “लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच मी पक्षासोबत फारकत घेतलीये. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच! निवडणूक न लढविल्यास ज्या लोकांनी माझ्यासाठी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यांचा हा अपमान असेल.”, असं वसंत मोरे म्हणाले होते.

“कोरोना काळात मी केलेले काम पाहून लोक मला मतदान करतील आणि मी पुणेकरांचा (Pune Loksabha ) उमेदवार असेल.”,असं वसंत मोरे म्हणाले आहेत. त्यामुळे यंदा पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमनेसामने पाहायला मिळणार आहेत.

वसंत मोरे यांचा निर्धार

“वसंत मोर आहे तोपर्यंत पुण्यातील निवडणूक एकतर्फी होणार नाही. मी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे. कोणी-कोणी माझ्या वाटेत काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळ अलयावर बाहेर काढणार. मी पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे.”, असा निर्धारच वसंत मोरे यांनी केला आहे.

News Title- Vasant More will contest as an independent in Pune Loksabha

महत्त्वाच्या बातम्या –

संजय राऊतांची मोदींवर टीका, एकनाथ शिंदे भडकले, राऊतांना झापलं…

अरविंद केजरीवालांच्या संपत्तीचा आकडा आला समोर!

सर्वात मोठी बातमी! ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक

अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

‘पुष्पा 2’ मधील रश्मिकाचा लूक समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Join WhatsApp Group

Join Now