Vasant More | पुणे लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम करत नवीन मार्ग शोधला. अनेक दिवसांपासून वसंत मोरे (Vasant More) हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मनसेनं त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट न दिल्यानं वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेतून बाहेर पडत अनेक पक्षांच्या कार्यालयामथ्ये जात नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मात्र आता पुण्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट निर्माण झाला आहे. वसंत मोरे (Vasant More) यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिलं आहे. वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत.
वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी
अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये जात होते. त्यावेळी ही राजकीय भेट नसल्याचं वसंत मोरे म्हणाले होते. दरम्यान ते वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर मोरे हे मनोज जरांगे पाटील यांच्या देखील भेटीला गेले होते. त्यानंतर लगेचच त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून तिहेरी लढत
पुणे लोकसभा मतदारसंघातून तिहेरी लढत होणार आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपमधून मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर नुकत्याच आलेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
काही दिवसांआधी पुणे येथे वसंत मोरे, मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर हे एका छताखाली आले होते. ते एकत्र दिसत होते. तेव्हापासून पुण्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होणार अशी शक्यता होती. त्यानंतर वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिल्याची मोठी अपडेट पुण्याच्या राजकारणातून समोर आली आहे.
News Title – Vasant More Get Ticket Of Pune Lok Sabha From Vanchit Bahujan Aghadi Party
महत्त्वाच्या बातम्या
रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…
“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”
“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई






