वसई- विरारकरांसाठी महत्वाची बातमी! पुढील 3 ते 4 दिवस पाणीकपात

On: June 17, 2025 3:10 PM
Pune News
---Advertisement---

Vasai Virar Water Cut | राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाही वसई-विरार शहरात पाणीकपातीचं संकट उभं राहिलं आहे. वसई-विरार (Vasai Virar Water Cut) शहर महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे की, येत्या तीन ते चार दिवसांपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. (Vasai Virar Water Cut)

वादळी पावसामुळे वीजपुरवठा ठप्प, पाणीपुरवठ्यावर परिणाम :

वसई-विरार महापालिकेला दररोज 200 दशलक्ष लिटर पाणी सूर्या टप्पा-1 आणि 3 योजनेतून मिळते. त्याचबरोबर MMRDAच्या सूर्या पाणी योजनेतून 150 दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. मात्र, 13 जूनपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो आहे.

विशेषतः कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्र (कासा विक्रमगड), मासवण आणि धुकटण येथील केंद्रे याठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे वीज तारांवर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे MSEDCL मार्फत होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. (Vasai Virar Water Cut)

Vasai Virar Water Cut | १६ जूनपासून पाणीपुरवठा विस्कळीत :

१६ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून MMRDAच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. त्यामुळे सध्या शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात सुरू आहे. ही परिस्थिती किमान पुढील ३ ते ४ दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, अत्यावश्यक वापरापुरतेच पाणी वापरावे आणि महापालिकेच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन वसई-विरार शहर महानगरपालिकेने केलं आहे.

News Title: Vasai-Virar Faces Water Crisis Amid Monsoon Rains, 3-4 Days Water Cut Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now