Vivo V70 FE | नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. विवो (Vivo) कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन Vivo V70 FE स्मार्टफोन लॉन्च केला आहे. दमदार 200 मेगापिक्सेल कॅमेरा, 7000mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसारख्या आधुनिक फीचर्समुळे हा फोन सध्या चर्चेत आहे.
दमदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि शक्तिशाली प्रोसेसर :
विवो (Vivo) च्या Vivo V70 FE या स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा 1.5K रिझोल्यूशन असलेला OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 1900 निट्स पीक ब्राइटनेस आणि HDR10 Plus सपोर्टसह येतो, ज्यामुळे व्हिडिओ पाहताना आणि गेमिंग करताना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या फोनमध्ये वेगवान कामगिरीसाठी 4nm तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेंसिटी 7360 टर्बो प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 (Android) आधारित ओरिजिनओएस 6 (OriginOS) वर चालतो. (200MP Camera Phone)
फोटोग्राफीच्या दृष्टीनेही हा फोन खूप शक्तिशाली आहे. फोनच्या मागील बाजूस ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, तर त्यासोबत 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय एआय मॅजिक वेदर, एआय मॅजिक लँडस्केप आणि एआय फोर-सीझन पोर्ट्रेटसारखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फीचर्सही फोनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये अंडरवॉटर फोटोग्राफीचा सपोर्ट आणि डार्कनेस ग्लो तंत्रज्ञानही देण्यात आले आहे.
Vivo V70 FE | भारतामधील किंमत आणि उपलब्धता :
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Vivo V70 FE स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटसाठी 40,999 रुपये मोजावे लागतील, तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 44,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन मान्सून ब्लू आणि नॉर्दर्न लाइट्स पर्पल या दोन आकर्षक रंगांमध्ये बाजारात सादर करण्यात आला आहे.
फोनची विक्री 9 एप्रिलपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. खरेदीदरम्यान एसबीआय (SBI), अमेरिकन एक्सप्रेस (American Express), येस बँक (Yes Bank) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक किंवा इंस्टंट डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो.
स्पर्धेच्या दृष्टीने हा फोन वनप्लस 13R 5G (OnePlus 13R 5G), शाओमी 14 CIVI (Xiaomi 14 CIVI) आणि विवो V30 Pro 5G (Vivo V30 Pro 5G) सारख्या स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करणार आहे. विशेष म्हणजे कंपनी या फोनसाठी 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.






