पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या; एकदा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

On: April 3, 2026 8:29 PM
Pakistan Fuel Price Hike
---Advertisement---

Pakistan Fuel Price Hike | पाकिस्तानमध्ये इंधन दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ झाली असून पेट्रोल 458 पाकिस्तानी रुपये तर डिझेल 520 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. या अचानक वाढीमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. (Pakistan fuel price hike)

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ :

मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसू लागला आहे. विशेषतः Pakistan मध्ये इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच दरवाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात दुसऱ्यांदा दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

सरकारच्या नव्या निर्णयानुसार डिझेलच्या किंमतीत सुमारे 54.9 टक्के वाढ झाली असून दर थेट 520.35 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. त्याचवेळी पेट्रोलच्या किंमतीत 42.7 टक्क्यांनी वाढ होत दर 458.40 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. या वाढीमुळे पेट्रोलमध्ये 137.23 रुपये आणि डिझेलमध्ये 184.49 रुपये प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. (diesel price Pakistan)

Pakistan Fuel Price Hike | नागरिकांचा संताप; पंपांवर रांगा :

दरवाढीची घोषणा होताच अनेक शहरांमध्ये नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेषतः कराची (Karachi) सारख्या मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अचानक वाढलेल्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

या दरवाढीबाबत माहिती देताना पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री Ali Pervaiz Malik यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे ही दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मध्यपूर्वेतील तणाव आणि विशेषतः Iran आणि United States यांच्यातील संघर्षजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Pakistan Fuel Price Hike)

दरम्यान, या परिस्थितीतही India मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे 60 रुपयांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title: Fuel Price Shock in Pakistan: Petrol Reaches PKR 458 and Diesel PKR 520 Per Litre, Public Angry

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now