‘एका तासाची सोय होईल?’, अभिनेत्री वनिता खरातचा अत्यंत धक्कादायक खुलासा

On: March 13, 2024 11:39 AM
Vanita Kharat
---Advertisement---

Vanita Kharat | महाराष्ट्राची हास्यजत्रा या छोट्या पडद्यावरील विनोदी मालिकेमुळे महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणून वनिता खरातची (Vanita Kharat) ओळख आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. तिचं काही महिन्यांआधी लग्न झालं आहे. त्यामुळे ती चर्चेत होती. आता पुन्हा एकदा ती एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

आपल्या आयुष्यामध्ये अनेक किस्से घडत असतात. मात्र काही किस्से असे असतात की ते आपण कधीही विसरू शकत नाही. असेच काहीसे किस्से अभिनेता, अभिनेत्री यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगलिंगच्या काळामध्ये घडत असतात. असाच एक किस्सा वनिता खरात (Vanita Kharat) सोबत घडला होता. तो किस्सा एका युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला.

वनिता खरातने (Vanita Kharat) आपल्या आयुष्यातील घडलेला एक धक्कादायक किस्सा सांगितला होता. तो किस्सा तिने ‘ओसावा’ या युट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना सांगितला आहे. एका अज्ञाताने तिला एका तासाची सोय होईल का? असा प्रश्न विचारला होता. याप्रश्नावर वनिता खरात (Vanita Kharat) थंडावून गेली असल्याचं तिनं मुलाखतीमध्ये सांगितलं.

वनितासोबत काय घडलं?

वनिता खरातने नुकतीच ओसावा या युट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिनं घडलेला किस्सा सांगितला. “मी एका माझ्या मौत्रिणीला दादरला सोडायला गेले होते. तेव्ही मी तिथं एका कट्ट्यावर बसले होते. त्यावेळी माझी मैत्रीण वॉशरूमला गेली. तेव्हा तिथं दोन पुरूष आले आणि त्यांनी मला नाशिकला जाणारी गाडी कुठं मिळेल असं विचारलं. मी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाऊन विचारा असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बस स्टँड आहे का? असं विचारलं तेव्हा त्यावर मी बस स्टँड सांगितलं”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aapali Sosal Vaahini (@aasova_)

“एक तासाची सोय आहे का?”

“त्यानंतर ते तिथं काहीवेळ घुटमळत होते. पुन्हा त्यांनी मला थेट विचारलं की इथं अशी काही सोय आहे का? एक तासाची सोय आहे का? असा प्रश्न केला ते ऐकून मी थंडच पडले. मला आरे केलं की थेट कानाखाली मारणारी मुलगी आहे. पण त्यावेळी मी काहीच करू शकले नाही. त्यानंतर माझी मौत्रिण आल्यानंतर ते तिथून पसार झाले. त्यावेळी मला वाटलं की हे माझ्याबाबतीत का झालं आहे.” आपल्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा वनिता खरातने सांगितला आहे.

वनिता खरात ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं बॉलिवूडमधील कबीर सिंग चित्रपटामध्ये कबीर सिंगच्या मोलकरणीची भूमिका केली होती. तसेच तिनं काही वर्षांआधी एक न्यूड फोटोशूट केला होता, त्यामुळे ती अधिक चर्चेत आली होती. त्यानंतर तिनं रानबाजार या वेबसिरिजमध्ये देखील वैश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका केली होती.

News Title – Vanita Kharat Entertainment News

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

“फडणवीस यांच्या डोक्याला…”, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षातून थेट ऑफर

‘देवेंद्र फडणवीसांनी मला हा निरोप पाठवला…’; जरांगेंचा मोठा खुलासा

‘राजकुमार येण्याआधी मी अनेकांना…’; तापसी पन्नूच्या वक्तव्याने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now