वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर कुठून लढणार?

On: March 27, 2024 9:32 PM
Prakash Ambedkar ON Manoj Jarange And Devendra Fadanvis Marathi Latest News
---Advertisement---

Vanchit Bahujan Aghadi list | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अशातच राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणामध्ये नवा डाव टाकला आहे. त्यांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतला असून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आपल्या बाजूनं वळवून घेतलं आहे. (Vanchit Bahujan Aghadi list)

महाविकास आघाडीनं मराठा आरक्षणाकडं दुर्लक्ष केलं. मनोज जरांगे पाटील यांच्याकडं दुर्लक्ष केलं असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आता राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवला आहे. (Vanchit Bahujan Aghadi list)

राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडी कमिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Vanchit Bahujan Aghadi list)

वंचित बहुजन आघाडीच्या कमिटीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. तसेच रामटेक मधील उमेदवारांचा निर्णय सायंकाळी 4 वाजेपर्यंत होईल.

प्रकाश आंबेडकर कुठून लढणार?

प्रकाश आंबेडकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीला अकोल्यातून उमेदवारी मिळवली होती. यंदाही प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामधून निवडणूक लढणार असल्याने अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

उमेदवारांची नावे

अकोला –  प्रकाश आंबेडकर

भंडारा-गोंदिया –  संजय केवट

गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी

चंद्रपूर – राजेश बेले

बुलडाणा –  वसंत मगर

यवतमाळ-वाशिम –  खेमसिंग पवार

वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके

अमरावती –  कु. प्राजक्ता पिल्लेवान

रामटेक – अद्यापही अपडेट नाही

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोरे मार्ग निवडला. त्याचा प्रकाश आंबेडकर यांना फायदा झाला. ओवैसींसोबत हातमिळवणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील काही जागांवर विजय मिळवला. ते सोलापूर आणि अकोल्यामध्ये ताकदीनीशीर लढले होते.

News Title – Vanchit Bahujan Aghadi Candidate List

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता; विद्यमान खासदार ठाकरेंच्या वाटेवर?

महायुतीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट; छगन भुजबळ लोकसभेची निवडणूक लढवणार?

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

SIP मध्ये जास्त फायदा हवा असेल तर या 4 गोष्टी लक्षात घ्या; होईल फायदाच फायदा

या विभागात सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार; या तारखेपर्यंत अर्ज करू शकता

Join WhatsApp Group

Join Now