Valentine Day | फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. यासाठी अनेक तरूण तरूणी आपल्या जोडीदारासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा इजहार करताना दिसत असतात. या महिन्यातील लग्न झालेली जोडपी असो वा कॉलेज तरूण असो या महिन्यात ते बेधुंद असतात. कॉलेजमधील अनेक तरूण आणि तरूणी आपल्या जोडीदाराला आपलं नातं टिकवण्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू देताना दिसतात. याचं सर्वाधिक प्रमाण हे कॉलेजमध्ये पाहायला मिळतं. त्यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे (Valentine Day) वेलेंटाईन डे.
‘वेलेनटाईन डे’ला अनेक तरूण-तरूणी आपल्या प्रियकरासोबत वेळ घालवत एकमेकांच्या नात्याला आणखी फुलवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या नात्यातील गोडवा टिकवण्याकडे या वेलेटाईनकडं पाहिलं जातं. यासोबतच हा दिवस भेटवस्तूंनी आणखीनच फुलून जातो. यादिवशी खर्चिक भेटवस्तू देणं हे अनेकदा शक्य होईलच असं नाही. यामुळे आपल्या प्रियकराला, जोडीदाराला भेटवस्तू देण्यासाठी घरगुती भेटवस्तु बनवता येणार आहे.
जोडीदाराला भेटवस्तू देण्यासाठी करा ‘हे’
1) जोडीदाराला महाग वस्तू देणं अपेक्षित नसतं. जोडीदार समजून घेणारा असेल तर कमी खर्चातही भेटवस्तू देता येते. यासाठी घरगूती ग्रिटिंग कार्ड तुम्ही आपल्या जोडीदाराला देऊ शकता. हे बनवायलाही सोपं आहे आणि कमी खर्चिक आहे.

2) जोडीदाराला इंम्प्रेस करण्यासाठी चॉकलेट भेटवस्तू हा पर्याय योग्य आहे. हल्ली बाहेर भेटणाऱ्या वस्तु आता घरी देखील बनवता येतात. त्याचप्रमाणे घरगुती तयार केलेलं चॉकलेट आता आपल्या जोडीदाराला आपण देऊ शकतो. फक्त चॉकलेट बनवताना वेगवेगळ्या आकारामध्ये चॉकलेट तयार करण्याचा साचा असेलतर तुमचा वेलेंटाईन डे सोन्याहून पिवळा असेल.

3) स्वीट बट शॉर्ट ही संकल्पना अनेकांना माहिती असावी. साधेपणातही सर्वकाही समावून घेता येतं. अर्थातच एक चार्ट पेपर घेत त्यावर आपल्या जोडप्यांचे फोटो कॉलेज करून एखाद्या साध्या गमने किंवा स्टिकने चिकटवू शकता. यासाठी फारसा खर्च येत नाही. आपल्या आठवणी जपून ठेवण्यासाठी ही संकल्पना फार साधी आणि सोपी आहे.

4) गुलाबाऐवजी करा ‘हे’
दरवर्षा ‘वेलेंटाईन डे’ला प्रेमाचं प्रतिक असलेलं गुलाब आपल्या जोडीदाराला दिलं जातं आणि प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र यामध्ये अनेक गुलाब पायदळी तुडवले जातात. यासाठी गुलाबाऐवजी एखाद दुसरं विनकाम केलेलं कोणतंही फुल आपण आपल्या जोडीदारास दिल्यास जोडीदार त्याचा आदराने स्विकार करेल.

News Title – Valentine day Special gift made from home
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…
संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”
समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर
आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग
‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल






