वैभव सूर्यवंशीने IPL लिलावासंदर्भात केला धक्कादायक खुलासा!

On: June 9, 2026 1:56 PM
Vaibhav Sooryavanshi (1)
---Advertisement---

Vaibhav Sooryavanshi | आयपीएल 2026 (IPL 2026) हंगामात आपल्या तुफानी फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने एक रंजक खुलासा केला आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून खेळताना त्याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आणि हंगामातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ऑरेंज कॅप तसेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP) पुरस्कार आपल्या नावावर केला. मात्र आयपीएल लिलावावेळी त्याच्या मनात वेगळ्याच भावना होत्या.

1.10 कोटींची बोली लागूनही होता नाराज :

आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्याशी स्पर्धा करत वैभवला 1 कोटी 10 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. हा क्षण त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला गेला. परंतु एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही तो पूर्णपणे समाधानी नव्हता, असे त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

वैभवच्या मते, निवड झाल्यानंतर त्याच्या मनात सर्वप्रथम एकच प्रश्न आला होता. त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती, विविध ट्रायल्समध्येही प्रभावी कामगिरी दाखवली होती, तरीही फक्त दोनच संघांनी त्याच्यासाठी बोली का लावली? स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असल्याने इतर फ्रँचायझींनी स्वारस्य का दाखवले नाही, याचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्यामुळे लिलावानंतर आनंदासोबत थोडी खंतही त्याच्या मनात होती.

Vaibhav Sooryavanshi | राजस्थान रॉयल्सबद्दल व्यक्त केल्या भावना :

मात्र गेल्या दीड वर्षांच्या प्रवासानंतर वैभवचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा भाग झाल्यानंतर मिळालेल्या वातावरणाबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. संघातील प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन आणि फिजिओ यांच्याकडून मिळणारे सहकार्य कुटुंबातील सदस्यांसारखे असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या संघात आल्याबद्दल तो देवाचे वारंवार आभार मानत असल्याचेही त्याने नमूद केले.

तो पुढे म्हणाला की, संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला सातत्याने मार्गदर्शन मिळते. खेळातील कोणत्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि कोणत्या चुका टाळायच्या, याबाबत त्याला मोलाचे सल्ले मिळतात. या वातावरणामुळे त्याच्या खेळात सातत्याने सुधारणा होत असून भरपूर शिकण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये त्याने 16 सामन्यांत 237 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅप आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला.

News Title: Vaibhav Sooryavanshi Reveals IPL Auction Surprise

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now