“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

On: April 20, 2024 8:15 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. वेळापूरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण उत्तम जानकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

उत्तम जानकर यांनी केलं खळबळजनक वक्तव्य :

गेल्या कित्येक दिवसांपासून उत्तम जानकर (Uttam Jankar) कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सर्व राजकीय नेतेमंडळींचं लक्ष होत. मात्र आता हे चित्र स्पष्ट झालं आहे. वेळापूरमध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे कुटुंब तब्बल 30 वर्षांचे वैर संपवून एकत्र आल्याचे समोर आले आहे.

यावर उत्तम जानकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे की, मी सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहे. मात्र, बारामतीमध्ये अजित पवारांना पाडूनच मी पक्ष सोडणार आहे. त्यामुळे उत्तम जानकर आता मोहिते पाटील कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. उत्तम जानकर यांच्या या निर्णयामुळे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar l खासदारकी मोहिते पाटलांना तर आमदारकी उत्तम जानकरांना :

जानकर आणि मोहिते पाटील यांनी तब्बल 30 वर्षांचे वैर सोडून एकत्र येण्याचा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये एक समीकरण ठरलं आहे. तर खासदारकी मोहिते पाटील लढवणार तर आमदारकी उत्तम जानकर लढवणार अशी बोली त्यांच्यामध्ये झाली आहे.

गेली सहा महिन्यापासून धैर्यशील मोहिते पाटील व उत्तम जानकर कुटुंब एकत्र येणार हे ठरले होते. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर 302 नुसार जुना गुन्हा दाखल करण्याच्या व उत्तम जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या धमक्या वारंवार येत आहेत असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे. मात्र आता हे दोन्ही कुटूंब एकत्र येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

News Title – Uttam Jankar Against On Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या – 

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?

नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या राऊतांना नवनीत राणांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

‘सुनेला हिणवणाऱ्या पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच’, भाजपचा टोला

बसमध्ये तरूणी आली बिकिनी घालून, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now