अरे बापरे! उर्फीचे कपडेच चोरीला गेले

On: February 23, 2023 12:24 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्यांच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. यामुळं उर्फी अनेकदा चर्चेचा विषय ठरते. यामुळं तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मध्यंतरी हा वाद जास्त उफाळून आल्याचं देखील पाहायला मिळालं.

आता मात्र उर्फी एका नवीन कारणामुळं चर्चेत आली आहे. कोणतेही विचित्र कपडे घातल्यामुळं नाहीतर तर घडलेल्या एका प्रकारामुळे उर्फी चर्चेत आली आहे. उर्फीनं एका कॅब चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार दिल्लीमध्ये (Delhi) घडला आहे. यासगळ्याविषयीचा किस्सा उर्फीनं तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे .

झालं असं की उर्फीनं उबर (Uber) अॅपवरुन कॅब बूक केली होती. त्याविषयीचा तिचा अनुभव अजिबात चांगला नव्हता. जी कॅब उर्फीनं प्रवासासाठी बुक केली होती, तो कॅब ड्रायव्हर (Cab driver) उर्फीचं सामान घेऊन गायब झाला होता. त्यामुळे उर्फीची चांगलीच तारांबळ उडाली.

विमानतळाच्या (Airport) एका वाटेवर जेवणासाठी उर्फी थांबली होती. तितक्यात कॅब ड्रायव्हर तिचं सामान घेऊन पळून गेला. अखेर उर्फीच्या मित्राच्या सततच्या काॅलमुळं तो ड्रायव्हर पुन्हा आला. गेले एक तास त्या ड्रायव्हरला फोन केले जात होते. एकातासांनतर जेव्हा ड्रायव्हर परत आला तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता.

या सगळ्या प्रकारामुळं संतापलेल्या उर्फिनं तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी देखील पोस्ट केली आहे. उबर कृपया काहीतरी करा. हा महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न आहे. मला अतिशय वाईट अनुभव आला आहे. ड्रायव्हरनं माझं सामान घेतलं आणि दोन तासांनी तो नशेत परतला होता. उर्फिच्या पोस्ट आणि ट्टविटनंतर कंपनीनं उर्फीची माफी मागितली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now