PhonePe, Paytm युझर्स लक्ष द्या! दोनच दिवस उरले, १५ सप्टेंबरपासून UPI बाबत मोठा बदल

On: September 12, 2025 4:04 PM
UPI Credit Line
---Advertisement---

UPI Transaction Limit | UPI वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. राष्ट्रीय देयके मंडळ (NPCI) ने जाहीर केल्याप्रमाणे, 15 सप्टेंबर 2025 पासून काही व्यवहारांसाठी नवी मर्यादा लागू होईल. PhonePe, Paytm, Google Pay यांसारख्या लोकप्रिय अॅप्सवर याचा थेट परिणाम होणार आहे. (UPI Transaction Limit 2025)

मोठ्या व्यवहारासाठी वाढीव मर्यादा :

नव्या नियमांनुसार, विमा हप्ता, कॅपिटल मार्केटमधील गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल भरणे, ट्रॅव्हल बुकिंग अशा श्रेणींमध्ये ग्राहक एका व्यवहारात 5 लाख रुपये पर्यंतची रक्कम भरू शकतील. तसेच २४ तासांत जास्तीत जास्त 10 लाख रुपये अदा करता येतील.

कॅपिटल मार्केट गुंतवणूक : 5 लाख प्रति व्यवहार, 10 लाख प्रति दिवस

विमा हप्ता : 5 लाख प्रति व्यवहार, 10 लाख प्रति दिवस

क्रेडिट कार्ड बिल भरणे : 5 लाख प्रति व्यवहार, 6 लाख प्रति दिवस

ट्रॅव्हल बुकिंग : 5 लाख प्रति व्यवहार, 10 लाख प्रति दिवस

NPCI च्या मते, या निर्णयामुळे ग्राहकांना लहान-लहान हप्त्यांमध्ये व्यवहार करण्याची गरज राहणार नाही.

UPI Transaction Limit | सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम? :

पर्सन टू पर्सन (P2P) व्यवहारासाठीची मर्यादा एक लाख रुपये प्रति दिवस कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच मित्र-नातेवाईकांना पैसे पाठवताना जुनीच मर्यादा लागू राहील. मात्र, मोठे व्यवहार करणाऱ्या विमा धारक, गुंतवणूकदार किंवा प्रवास करणाऱ्यांना या बदलाचा मोठा फायदा होणार आहे. (UPI Transaction Limit 2025)

लहान व्यवहारांसाठी UPI लाईट वापरण्याची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या या सेवेतून ग्राहक ₹500 पर्यंतचे व्यवहार सहज करू शकतात. छोट्या पेमेंटसाठी ही सेवा नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. आता मोठ्या व्यवहारांसाठी NPCI ने दिलेला दिलासा ग्राहकांसाठी उपयोगी ठरणार आहे.

बदलाचा थेट फायदा :

या नव्या नियमामुळे PhonePe, Paytm, Google Pay युजर्सना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, विमा हप्ते, क्रेडिट कार्ड बिल आणि ट्रॅव्हल बुकिंग सहजपणे करता येतील. दिवाळीपूर्वीच ग्राहकांना या बदलाचा थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. (UPI Transaction Limit 2025)

News Title: UPI Transaction Limit Change from 15 September: PhonePe, Paytm Users Can Now Pay Up to ₹5 Lakh Per Transaction

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now