Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी बातमी!

On: July 28, 2025 5:44 PM
Thumbpay Update
---Advertisement---

UPI Rule Change | 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारात मोठे बदल होणार आहेत. Paytm, PhonePe, GPay यांसारख्या UPI अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ (NPCI) ने UPI प्रणालीवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रणाली अधिक वेगवान करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. (UPI Rule Change)

यामध्ये बॅलन्स तपासणीसाठी मर्यादा, स्टेटस रिफ्रेशवर कंट्रोल आणि ऑटोपे व्यवहारांसाठी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या बदलामुळे यूजर्सना आता काही सेवा मर्यादित वेळ आणि प्रमाणातच वापरता येणार आहेत.

दिवसातून केवळ 50 वेळाच बॅलन्स तपासता येणार :

नवीन नियमांनुसार, UPI अ‍ॅपवरून बॅलन्स तपासण्याची मर्यादा लागू करण्यात आली आहे. यानुसार, दिवसातून केवळ 50 वेळाच बॅलन्स तपासता येईल. तसेच बँक खात्याची माहिती किंवा स्टेटस फक्त 25 वेळा रिफ्रेश करता येणार

यामुळे अनावश्यक ट्रॅफिक आणि सिस्टमवरील लोड कमी होईल. याचा थेट फायदा असा की UPI व्यवहारांदरम्यान येणाऱ्या त्रुटी, अपयशी व्यवहार आणि स्लो नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

UPI Rule Change | AutoPay व्यवहारांसाठी आता ‘वेळापत्रक’ :

UPI ऑटोपे (AutoPay) व्यवहार जसे की नेटफ्लिक्स/ओटीटी सब्स्क्रिप्शन, लाईट/पाणी बिल, EMI इत्यादी आता दिवसभर न करता, फक्त ठराविक वेळेतच होणार आहेत. नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे: (UPI Rule Change)

सकाळी 10 वाजण्यापूर्वी

दुपारी 1 ते 5 दरम्यान

रात्री 9:30 नंतर

या वेळेपलीकडे ऑटोपे व्यवहार यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे यापुढे सब्स्क्रिप्शन रिन्यू किंवा बिल कट कधी होणार, याचे भान वापरकर्त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. मात्र, इतर UPI ट्रान्सफर व व्यवहारांवरील सामान्य मर्यादांमध्ये (जसे ₹1 लाख प्रतिदिन) कोणताही बदल झालेला नाही.

News Title: UPI Rule Changes from August 1: Paytm, PhonePe, GPay Users to See Balance Check and AutoPay Limits

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now