सावधान! पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा थेट इशारा

On: February 22, 2026 11:28 AM
Maharashtra Rain
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यासह देशभरातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत असून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट गडद झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) राज्यासाठी थेट इशारा जारी केला असून पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामानातील चढउतारामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांचीही चिंता वाढली आहे.

मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता :

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन अशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. थंडी, उन्हाळा आणि पावसाचा एकत्रित प्रभाव जाणवत असतानाच काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले होते. त्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळू शकतो. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत राहतील आणि उन्हाच्या झळा तीव्र असतानाच पावसाची हजेरी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert | तापमानातील चढउतार आणि प्रदूषणाचा प्रश्न :

दरम्यान, उत्तरेकडील भागात थंडीचा प्रभाव अद्याप कायम असला तरी राज्यातील बहुतांश भागात थंडी कमी झाली आहे. पहाटे किंचित गारवा जाणवतो, मात्र दिवसभर उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर ब्रह्यपुरी येथे 36.7 अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदवले गेले. आगामी काळात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील थंडी जवळपास कमी झाली होती. डिसेंबरमध्ये जाणवलेला गारठा नंतर ओसरला. फेब्रुवारीत थंडी कमी राहील, असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता; मात्र आता पावसामुळे हवामानाने वेगळेच रूप धारण केले आहे. मुंबईमध्ये वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे हवा धोकादायक पातळीवर गेली असून हा मुद्दाही गंभीर बनला आहे. राज्यासोबतच पंजाब, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

News title : Unseasonal Rain Alert in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now