नवी दिल्ली| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण(Nirmala Sitharaman) यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक तब्येत खराब झाल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,अशी माहिती समोर आली आहे.
त्यांच्यावर खासगी वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांना रूग्णालयात दाखल करण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
राॅटर्सनं अर्थ मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्यानं, निर्मला सीतारामण यांना नेमकं काय झालं आहे, हे अद्यार समजू शकलं नाही.
महत्वाच्या बातम्या-






