‘या’ योजने अंतर्गत शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तब्बल ‘इतके’ रूपये देतंय

On: December 19, 2022 5:34 PM
---Advertisement---

मुंबई | केंद्र(Central Goverment) आणि राज्य सरकारद्वारे(State Goverment) शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात. आता आम्ही अशाच सरकारच्या एका योजनेची(Yojana) माहिती देणार आहोत, ज्या योजने अंतर्गत सरकार शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रूपये देते.

‘पीएम किसान एफपीओ योजना'(FPO) ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची योजना आहे. या योजनेद्वारे शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 15 लाख रूपयांची मदत दिली जाते. तुम्हीही जर शेती व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते.

पीएम किसान एफपीओ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना, अकरा शेतकऱ्यांची मिळून एक संस्था किंवा संघटना बनवावी लागते. यानंतर या संघटनेला 15 लाख रूपयांची मदत मिळते. या पैशांचा उपयोग शेतकरी बियाणे घेणे, शेती उपकरणे घेणे किंवा इतर शेतीच्या कामांसाठी करू शकतात.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती घेऊयात. सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइट ओपन करा. यानंतर तुम्ही FPO या पर्यायावर क्लिक करा.

वरील प्रोसेसनंतर तुम्हाला एक फाॅर्म दिसेल. यावर तुम्हाला सर्व आवश्यक ती माहिती भरावी लागते. यानंतर तुम्ही तुमचे ओळखपत्र, पासबुक स्कॅन करून अपलोड करा. शेवटी सगळी माहिती व्यवस्थित भरली आहे का याची पुन्हा एकदा खात्री करा आणि फाॅर्म सबमीट करा.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now