टोरेस प्रकरणात बडा अभिनेता अटकेत; ब्रँड उभारणीत केली होती मदत

On: January 29, 2025 10:24 AM
Ukrainian Actor Armen Ataian Arrested in Tores Case for Helping Setup Brand
---Advertisement---

Tores Case | टोरेस प्रकरणात (Tores Case) आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) मढमधून (Madh) आर्मेन अटाइन (Armen Ataian) (४८) या युक्रेनियन अभिनेत्याला (Ukrainian Actor) अटक केली आहे.

आर्मेन हा बॉलिवूड चित्रपटांसह (Bollywood Movies) जाहिरातींमध्ये (Advertisements) सहायक अभिनेता म्हणून काम करत होता. त्याच्यावर टोरेस ब्रँड उभारण्यात मदत केल्याचा आरोप आहे. या अटकेमुळे आरोपींची संख्या सहावर गेली आहे. न्यायालयाने आर्मेनला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

उद्घाटनाला हजेरी

टोरेस ब्रँड उभारणीसाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये साकीनाका (Sakinaka) येथील एका बड्या हॉटेलमध्ये पहिली बैठक झाली होती. आर्मेनने तौसिफसोबत (Tausif) एक सनदी लेखापाल (Chartered Accountant) शोधून दिला होता. तो पहिल्या दोन बैठकांना आणि टोरेस ब्रँडच्या दादरमधील (Dadar) शोरूमच्या उद्घाटनाला हजर होता. कंपनी सुरू झाल्यानंतर आर्मेन बाजूला झाला. त्यानंतर, तो गुन्ह्यातील  अटक आरोपींच्या संपर्कात होता का, याबाबत पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

मुंबईकर असल्याचा दावा

आर्मेनने मुंबई महापालिकेचा (BMC) बनावट जन्म दाखला (Fake Birth Certificate) मिळवून त्याआधारे बनावट आधार कार्ड (Aadhaar Card), पॅनकार्ड (PAN Card) तयार केले आहे. याच कागदपत्रांच्या आधारे त्याने मुंबईमध्ये जन्म आणि १० वर्षे वास्तव्य असल्याचा दावा केला आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी करत असून, तो तपासात सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Tores Case)

युक्रेनियन आरोपींना केली मदत

युक्रेनियन आरोपींनी मुंबईमध्ये येत टोरेस ब्रँड सुरू केला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी आर्मेनशी संपर्क साधला. त्याने त्यांना टोरेस ब्रँड उभारण्यात मदत केली. तो पॅनकार्ड काढण्यासाठी तौसिफला भेटला होता. तसेच, त्यानेच युक्रेनियन आरोपींची तौसिफशी भेट घडवून दिल्याचे समोर आले आहे. (Tores Case)

Title: Ukrainian Actor Armen Ataian Arrested in Tores Case for Helping Setup Brand

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now