Dawood Ibrahim | दाऊद इब्राहिमबाबत उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

On: December 18, 2023 1:22 PM
Dawood Ibrahim
---Advertisement---

Dawood Ibrahim | पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय हालचाली जोरात आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये येथे निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानेही याची घोषणा केली आहे. दरम्यान संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट विस्कळीत झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कोणीतरी विषप्रयोग केल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता. यानंतर त्यांना कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Dawood Ibrahim | पाकिस्तानात इंटरनेट बंद

दाऊदची (Dawood Ibrahim) प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. अशात  1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला हाताळणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये.

उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानला जगापासून एखादी गोष्ट लपवायची असते, त्यावेळी पाकिस्तान सरकार संपूर्ण देशातील इंटरनेट सर्व्हिस बंद करतं, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.

दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी फक्त सोशल मीडियावरून पसरलेली नाही, तर पाकिस्तानमधील न्यूज चॅनेल्सनेही हे वृत्त चालवलं आहे. याच वृत्ताला आधार म्हणजे संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत, असं उज्ज्वल निकम म्हणाले.

पाकिस्तानी मीडियानेच या बातम्या चालवल्या आहेत की दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची मोठी पंचाईत झाली आहे. कारण आत्तापर्यंत पाकिस्तानने अधिकृतपणे, परवेझ मुशर्रफ यांच्यासह मोठ्या दर्पोक्तीने सांगितलं की, कोण दाऊद इब्राहिम ? आम्ही त्याला ओळखत नाही, असा दावा त्यांनी केला होता, असं निकम यांनी सांगितलंय.

दाऊद इब्राहिम हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला तेव्हा, दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा प्रत्यक्ष पुरावा आम्ही न्यायालयात दिला होता. पण पाकिस्तानचं पितळ उघड पडू नये म्हणून त्यांनी दाऊदला लपवलं, असं निकम म्हणाले.

Ujjwal Nikam’s big statement about Dawood Ibrahim

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2024 Auction | जे आधी कधीच झालं नाही ते होणार; आयपीएलच्या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर

Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!

Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?

Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ

Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now