UGC NET परीक्षेची तारीख बदलली; आता परीक्षा ‘या’ दिवशी होणार

On: April 29, 2024 6:58 PM
UGC NET
---Advertisement---

UGC NET जून 2024 सत्राच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. UGC NET 2024 ची परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 16 जून रोजी घेतली जाणार होती, ती आता बदलण्यात आली आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी केलेल्या ट्विटनुसार, आता ही परीक्षा 16 जून ऐवजी 18 जून 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

UGC NET l 10 मे पर्यंत अर्ज करता येणार :

यासंदर्भात उमेदवार आधीच UGC NET जून 2024 परीक्षेच्या तारखेची मागणी करत होते. कारण केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2024 देखील 16 जून रोजी होणार होती. यामुळे आता यूजीसी नेट परीक्षेची तारीख बदलून एनटीएने ती तारीख दोन दिवसांनी वाढवली आहे.

ज्या उमेदवारांना UGC NET परीक्षेत सहभागी व्हायचे आहे आणि ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही अशा उमेदवारांनी 10 मे पर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज प्रक्रिया करायचा आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी :

उमेदवारांनी अर्ज भरण्यासोबतच विहित अर्जाची फी जमा करणे आवश्यक आहे, तरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. सर्वसाधारण/अनारक्षित उमेदवारांसाठी 1150 रुपये, सामान्य-EWS/OBC NCL श्रेणीतील उमेदवारांसाठी 600 रुपये आणि SC/ST/PWD/तृतीय लिंगासाठी 325 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. UGC NET परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

News Title – UGC NET 2024 exam postponed

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बँक घोटाळा कसा झाला उघड?, मोठी माहिती हाती

राजकारणाचा चिखल!, काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार, भाजपसोबत जाऊन फुलवणार कमळ

“मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात…”, मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींचा पलटवार

अभिषेकसोबतच्या भांडणावर अखेर ऐश्वर्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

नागरिकांनो सावधान; घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now