उदयनराजे संतापले; वयाची आठवण करून देत शरद पवारांना सुनावलं

On: November 24, 2022 1:44 PM
---Advertisement---

पुणे | राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagatsinh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणी भाजप खासदार (Bjp Mp) उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील निशाणा साधलाय.

राज्यपालांनी वक्तव्य केलं तेव्हा व्यासपिठावर शरद पवार आणि नितीन गडकरी देखील होते. शरद पवार हे राजकारणातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार राज्यपालांच्या वक्तव्यावर काहीही बोलले नाहीत. त्यांनी काही तरी बोलायलं हवं होतं, असं म्हणत उदयनराजेंनी पवारांना सुनावलं आहे.

शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याविषयी कुणीही काहीही बोललं तर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.

दरम्यान, देशाला महासत्ता बनवायचं असेल तर शिवाजी महाराजांचे विचार महत्त्वाचे आहेत. सगळ्यांना एकत्र ठेवायचं असेल तर शिवाजी माहाराजांचे विचार सोडून चालणार नाही, असंही उदयनराजे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now