उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

On: December 2, 2022 3:16 PM
---Advertisement---

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आलीये. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांबाबत वक्तव्य केलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेच्या इतर महिला नेत्या अंधारात गेल्यात, त्यामुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडालाही सामोरं जावं लागणार आहे, असा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय.

आम्ही दोघंही बीड जिल्ह्यातले आहोत. या बाईला काय बोलावं कळत नाही. तिला बोलायला ठेवलंय. भुंकायला नाही. मेंदूला नारू झालाय की काय तिच्या, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केलीये.

सुषमा अंधारेंना प्रकाश महाजन यांनी प्रश्न केला. मातोश्री 2 हे कशावर झालं हे तिनं पाहिलं नाही का, 126 कोटी बापाचे, 11 कोटी मुलाचे कुठून आले? कशाला बोलताय?, असंही ते म्हणालेत.

राज ठाकरेंना पुत्रमोह झालाय, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. मात्र सुषमा अंधारेंना तो मोह होऊ शकत नाही, अशी तिची अडचण असल्याचं प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now