‘गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत पण…’; उद्धव ठाकरे संतापले

On: October 6, 2023 1:38 PM
---Advertisement---

मुंबई | नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या सरकारी रूग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रूग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सरकारकडे गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत परंतु रुग्णांवर उपचार करायला पैसे नव्हते. त्यामुळे या सरकारची नि:पक्षपातीपणे सरकारची सीबीआय चौकशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच रूग्णालयात गेलेल्या जीवाला जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

सध्या मी अस्वस्थ आहे कारण आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत हे बघून संताप येतो. कोरोनाचं संकट होतं तेव्हा मविआचं सरकार होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी (Uddav Thackeray) शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या सरकारी रूग्णालयात शिवसैनिकांनी जा आणि तिथे वास्तुस्थिती काय आहे डीन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जा. सध्या हा कारभार माणुसकीला सोडून चालू आहे. मात्र अध्यक्ष काय करत आहेत. पेशंट टेबलवर आणि डॉक्टर परदेश दौऱ्यावर, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now