‘एक माणूसही भाडखाऊ नाही…’; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

On: April 17, 2023 1:20 PM
---Advertisement---

नागपूर | महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) नागपूरमध्ये वज्रमूठसभा पार पडली. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्र सरकारवर तसेच राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

वज्रमूठ सभेसाठी आलेला एकसुद्धा कार्यकर्ता हा भाडखाऊ यामध्ये नाही, एकसुद्धा माणूस भाड्याने आणलेला नाही. त्यामुळे आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही असा थेट इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.

या सरकारमुळे संपूर्ण देश आणि राज्य नासून टाकलं आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे. आता जिंकेपर्यंत थांबायचं नाही. तुमच्यामध्ये वज्रमूठ आवळायची हिंमत होतेय ना?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

दरम्यान, तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो. मात्र गेल्या आठ वर्षात देशासाठी तुम्ही काय केलं ते सांगा, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now