“एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला, आता देशही बाहेर पडेल”

On: March 2, 2023 3:20 PM
---Advertisement---

मुंबई | कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. यावर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे.

वापरा आणि फेका ही भाजपची (BJP) नीती भाजपला भोवली असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पोटनिवणुक जिंकले याचा आनंद आहे. तसेच जर कसबा इतक्या वर्षानंतर बाहेर पडू शकतो, तर देश देखील बाहेर पडू शकतो, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला. त्यांनी अकाली दलापासून ममतापर्यंत तेच केलं. टिळक कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं, असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.

गिरीश बापटांसारख्या नेत्याला तब्येत बरी नसतानाही त्यांना प्रचारात आणलं. मनोहर पर्रिकर यांनाही त्यांनी तसंच प्रचारात आणलं होतं. पर्रिकरानंतर त्यांच्या मुलांना बाजूला टाकलं. ही त्यांची प्रवृत्ती आहे. सिलेक्टीव्ह वृत्ती आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now