नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?

On: May 9, 2024 11:49 AM
Dasara Melava 2025
---Advertisement---

Uddhav Thackeray l राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे प्रचारसभेचे वारे फिरत आहेत. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे. शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे सिंहासन जाळून भस्म करील असा इशारा उद्धव ठाकरेंनी मोदींना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडू शब्दात टीका :

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवी येथे प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडू शब्दात टीका केली आहे. ‘जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल,’ असेही त्यांनी स्पष्ट भाषेत हल्लाबोल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले तर आम्ही देखील नक्की देऊ, पण जर पाठीत वार केला तर वाघनखाने पलटवार करू. तुमची आमचे मुले चोरली, बाप चोरले आता पक्ष कसा चोरता तेच बघतोच असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Uddhav Thackeray l मोदी यांच्याकडे फक्त खोटे बोलण्याची गॅरंटी आहे :

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याच्या मुद्यावरून जाब विचारताना उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर लुटलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. ‘बाकी सगळे कंत्राटी, मी मात्र कायमस्वरूपी’ असा अविर्भाव असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 जूनला मतदार कंत्राटमुक्त केल्याचे दाखवून देईल असा थेट दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तसेच नरेंद्र मोदी आपल्या सुखात मीठ कालवत आहेत, जर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी माणसाला नोकरी मात्र द्यावी लागणार आहे. पंतप्रधानांनी उद्योगपती अदानी, अंबानींवर बोलताना त्यांना दिलेली कंत्राटे सर्वात आधी रद्द करावीत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त खोटे बोलण्याची गॅरंटी आहे असा विश्वास त्यांनी प्रचारसभेदरम्यान दिला आहे.

News Title – Uddhav Thackeray Statement On Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत

पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा

या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील

“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now