Weather Updates l सध्या राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. कारण राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता हवामानात बदल होऊन हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा वर्तवला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी :
राज्यातील नागरिक उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले असतानाच आता पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. तसेच राज्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात देखील आज अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. याशिवाय हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची संकट राहणार असल्याचे सांगितले आहे.
उष्णतेच्या लाटेने कोकण विभाग होरपळत आहे. अशातच आता कोकणासह मुंबई देखील पुढील चार दिवस उन्हाच्या तडाख्याने होरपळणार आहे. तसेच कोकण विभागात उष्णतेच्या लता येणार असल्या तरी देखील ठाण्यातील तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे ठाण्यातील तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather Updates l शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता :
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान होणार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
आयएमडीच्या अंदााजानुसार, विदर्भासह मराठवाड्यात 12 मे पर्यंत ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
News Title – Today Maharshtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य ठरलं बारामतीत कमी मतदान पडण्याला कारणीभूत
पुण्याच्या निवडणुकीत मिठाचा खडा; निवडणुका आयोगाने उमेदवारांना पाठवल्या धडाधड नोटिसा
या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील
“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”








