“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

On: April 21, 2024 8:47 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l सध्या राजकारणात मोठमोठे गौप्यस्पोट आहेत. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या मुंबईतील अँटॉप हिल येथील प्रचार सभेत चांगलेच कडाडले आहेत.

ती खोली शिवसैनिकांसाठी मंदिर आहे :

या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्रीमधील ज्या खोलीला तुम्ही कुठली तरी खोली म्हणत आहात, ती मातोश्रीमधील खोली बाळासाहेबांची आहे. ती खोली शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. त्याच खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बाळासाहेबांसमोर नाक रगडायला आले होते’, अशी टीका शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तसेच त्यावेळी त्या खोलीतअमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रवेश देखील दिला नव्हता असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचाराला भाई जगताप, राखी जाधव यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

Uddhav Thackeray l लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस; देवेंद्र फडणवीस

‘देवेंद्र फडणवीस मला भ्रमिष्ठ म्हणाले. पण मी भ्रमिष्ठ आहे की नाही ते देखील जनताच ठरवेल. फडणवीस, जनाची नाही तरी मनाची ठेवा. पण मात्र हे दोन्ही तुमच्याकडे नाही. लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘आज तुमच्यासमोर लोकांनी रान पेटवले आहे, तुमच्या चेल्यांना गावबंदी देखील केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 2014 साली सांगितले की, 5 वर्षांनी तुमच्या हातात या काही गोष्टी असतील. तर 2019 मध्ये पुढच्या पाच वर्षांत या गोष्टी असतील. सर्वात महत्वाचं म्हणजे आता तर थेट 2047 मध्ये काय असेल हे सांगत आहेत. मात्र तोपर्यंत कुणी असेल का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

News Title – Uddhav Thackeray Statement On Devendra Fadanvi

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now