अमित शाह फडणवीसांना म्हणाले; 2 मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस!

On: April 21, 2024 1:23 PM
Uddhav Thackeray revelation about meeting with Amit Shah and Devendra Fadnavis in 2019  
---Advertisement---

Uddhav Thackeray | एका पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मोठे गौप्यस्फोट केले. 2019 साली शिवसेनेनं भाजपसोबत वर्षांची युती तोडली. तेव्हा ‘मातोश्री’येथे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटीवेळी काय घडलं होतं याबाबत उद्धव ठाकरे यांनी काही दावे केले आहेत. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याबाबतही काही खुलासे केले आहेत.

‘मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करेन आणि स्वत:दिल्लीच्या राजकारणात जाईन, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण, नंतर भाजपने मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं,’ असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

यावर उद्धव ठाकरेंना वेड लागलं असून अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावा करतात अशी टीका फडणवीसांनी केली. याला ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलं आहे. ‘फडणवीस ज्याला कुठलीतरी खोली म्हणतायत ते मातोश्रीतलं मंदिर आहे, कारण ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. त्याच खोलीत अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते. त्या खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एंट्री केली होती. अमित शहा तुम्हाला म्हणाले, तू बाहेर बस. दोन मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस.’, असा खुलासा ठाकरेंनी केला आहे.

‘याच खोलीत अटल बिहार वाजपेयी आले होते. लालकृष्ण आडवाणी आणि राजनाथ सिंह आले होते. तिथेच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यायचे. त्या खोलीचं तुला महत्त्व माहिती नाही आणि तू नालायक माणसा त्या खोलीला कुठलीतरी खोली म्हणतोयस. मी तुला नालायक आणि कोडगा म्हणतोय. कारण माझ्या त्या खोलीबद्दलच्या भावना संवेदनशील आहेत.’, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याच्या आसपास अमित शाह मुंबईत आले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की सत्तेत आल्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं. त्यावर शाह म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्या चार-पाच महिन्यांच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.

यावेळी मला फडणवीस म्हणाले, मी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहीन आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करून मी दिल्लीला जाईन. मी आदित्यला चांगला तयार करतो. आपण अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू. मी त्यांना म्हटलं, आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. त्याला आधी आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू द्या. तुम्ही त्याला नक्कीच तयार करा. मात्र मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात घालू नका.

त्यावेळी मी फडणवीसांना विचारलं, तुम्ही इतके ज्येष्ठ नेते आहात आदित्यला मुख्यमंत्री केल्यानंतर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार? त्यावर ते म्हणाले, “मी दिल्लीला जाणार, मला अर्थखात्यातलं जरा बरं कळतं”, असा खुलासा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.  ते म्हणाले की, ” उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले असून खुर्ची गेल्यानंतर त्यांना काहीही समजत नाही. आज मी जाहीर करतो की, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा सल्ला मी दिला होता. पुढे जाऊन आदित्य ठाकरेकडे पक्ष सोपवायचा आहे, त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळालं पाहीजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता. ”

News Title : Uddhav Thackeray revelation about meeting with Amit Shah and Devendra Fadnavis in 2019  

महत्त्वाच्या बातम्या-

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

Join WhatsApp Group

Join Now