मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

On: April 24, 2024 8:50 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचार सभेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये जाहीर सभा घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

परभणी हा माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला :

यावेळी प्रचार सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तुफान शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आहे. मी संकटांशी झुंज देणार आहे, तुम्ही देणार आहात की नाही. मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार आहात की नाही… असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मावळे आहोत, आम्ही त्या संकटाला चिरडून टाकलं, मग हे संकट देखील काहीच नाही. कारण परभणी हा माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे.

भाजप पक्ष आणि मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं. पण परभणीकर हा पैशाने विकला जाणारा नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय ‘जय भवानी’ हा शब्द आपल्या प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने एका पत्रकात म्हटले आहे. मात्र, मी तो शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray l उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु होताच पावसाला सुरवात :

परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी तेथील लोकांनी पावसात भिजून संपूर्ण सभा ऐकली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देखील पावसात भिजत विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे.

तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर देखील अप्रत्यक्षित हल्ला केला आहे. भाजप पक्ष महाराष्ट्राला लुटत आहे. यावेळी अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. त्यामुळे महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं आहे.

News Title – Uddhav Thackeray Parbhavni News

महत्त्वाच्या बातम्या

भ्रष्टाचाराची कीड भाजपमध्ये येणार होती! ‘या’ नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

पुढील 24 तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब

‘संघर्षयोद्धा’ चित्रपट अडचणीत?; मनोज जरांगे पाटलांचा इशारा, म्हणाले…

शाळा 9 वाजल्यानंतर भरणार का?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बाप लेक एकाच चित्रपटात, लेकीचं करिअर घडवण्यासाठी शाहरूखने उचललं मोठं पाऊल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now