‘स्वत: मुख्यमंत्री होऊन पोराला…’; ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर

On: March 4, 2023 7:50 PM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटातील नेत्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घरचा आहेर दिला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला आहे.

जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री (CM) व्हायचं होतं तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होतं. कुणाकडे तरी पक्षाचं नेतृत्व द्यायला हवं होतं, असं संजय जाधव म्हणालेत.

सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला, एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवं होतं तो मिळाला नाही याचं दु:ख होतं, असं संजय जाधवांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवा होता तो दिला नाही, किंवा कुणाला पक्ष संघटनेकडे बघायला हवा होते तो वेळ उद्धव ठाकरेंनी दिला नाही. म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावली आहे. म्हणून या चोरांना संधी मिळाली, असंही संजय जाधव म्हणालेत.

जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते, आणि आदित्य ठाकरेंना मंत्री करायचे होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायला नको होते, असा सल्ला संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now