‘…त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही’; उद्धव ठाकरे आक्रमक

On: December 17, 2022 2:26 PM
---Advertisement---

मुंबई | महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) आज मुंबईत महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात आला आहे. ठाकरे गटासह, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, नाना पटोले संजय राऊत, आदित्य ठाकरे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केलीये.

संयुक्त महाराष्ट्रानंतर हा सर्वात मोठा लढा आहे. तसेच मी भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल मानत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालून जाऊ. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या नंतरचं हे दृश्य पहिल्यादाच देश पाहतोय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्या लोकांनी तेव्हा शेणमार, धोंडमार सहन करून कार्य केलं, त्यांनी ते केलं नसतं तर आज आपणही यांच्यासारखे मंत्री बनून शाब्दिक भीक मागत बसलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now