कशाला करतो गॅरंटीची बात!, रॅपच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

On: April 28, 2024 2:24 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray group | लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता 7 मेरोजी तिसरा टप्पा पार पडणार आहे.

त्यापूर्वी दोन्ही युती पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय. अशात उद्धव ठाकरे गटाने सोशल मीडियाचा जबरदस्त वापर केला आहे. त्यांनी रॅपच्या माध्यमातून भाजप विरोधात प्रचार केला आहे. रॅप द्वारे त्यांनी देशासह राज्यातील अनेक मुद्यांवर हाथ ठेवला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर (पूर्वीचे ट्वीट) एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यावर काय चाललंय? असं म्हणत अनेक मुद्दे पुढे ठेवले आहेत. या रॅप सॉन्गद्वारे ठाकरे गटाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.त्यांची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

शिवसेनेची पोस्ट चर्चेत

शिवसेनेच्या (ठाकरे गट) एक्सवर एक व्हिडिओ (Uddhav Thackeray group) टाकण्यात आलाय. त्यात एक रॅप सॉन्ग असून त्यात नेमकं काय म्हटलंय हे खाली दिलं आहे. सॉन्गद्वारे ठाकरे गटाने मोदींची जोरदार टीका केली आहे. त्यात महाराष्ट्रातील उद्योगधंदे, शिवसेनेचा न्यायालयीन मुद्दा, मोदींची 15 लाखांची घोषणा या सर्व मुद्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये काय म्हटलंय?

काय चाललंय?, अरे काय चाललंय?.. तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात, तुमच्या घरात, तुमच्या दारात काय चाललंय?.. तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात, तुमच्या देशात .. अरे काय चाललंय?.. चोरीच्या पाटी, लबाडी, बनवाबनवी.. फेकाफेकी.. जुमलेबाजी.. बोलाची कढी आणि बोलाचा भात.. कशाला करताय गॅरंटीची बात?.. काय चाललंय?.. अरे चाललंय तरी काय?

याला उचल.. त्याला उचल.. याला तोड.. त्याला फोड, पक्ष पळव चिन्ह पळव, वॉशिंगमध्ये टाकून तू धुवून टाक.. क्लीनचिट गद्दारांना देऊन टाक. लोकशाही फाडून टाक.. काय चाललंय?.. अरे काय चाललंय?.. बँकेत अजून 15 लाख आलेच नाहीत.

हाताला काम नाही, डोक्यावर छप्पर नाही, घामाला दाम नाही, नोकरीला पैसा नाही ..अरे काय चाललंय?.. अरे चाललंय तरी काय? उद्योग पळवले, धंदे पळवले.. कुठे नेऊन ठेवले? गुजरातला.. 50 खोके.. एकदम ओके.. ओके.. अरे नॉट ओके.. ही हुकुमशाही फेकून दे.. दे फेकून.. अरे चाललंय तरी काय?.. आता घ्या हाती मशाल. असं या रॅप सॉन्गमध्ये म्हटलं आहे.

News Title : Uddhav Thackeray group rap song in discussion

महत्वाच्या बातम्या- 

इथे मिळतंय मोफत पेट्रोल! मतदान करा अन् ‘इतक्या’ रुपयांचं पेट्रोल मोफत मिळवा

संजय राऊतांचा अजित पवारांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण; अनेक लोक होतायेत बेशुद्ध

निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!, कांद्यावरील बंदी कायम, ती आकडेवारी जुनी

शरद पवारांचा महायुतीला गंभीर इशारा, म्हणाले…

Join WhatsApp Group

Join Now