एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा मोठा डाव, ठाण्यात खेळणार राजकीय खेळी?

On: October 23, 2024 10:27 AM
uddhav thackeray big step against cm shinde
---Advertisement---

Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्ष आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही काल (22 ऑक्टोबर)आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा देखील समावेश आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून विधानसभा लढणार आहेत. (Uddhav Thackeray )

शिंदे यांना याच जागेवर पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून ते ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

आनंद दिघेंच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट?

या निवडणुकीत केदार दिघे यांना मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात उतरवून उद्धव ठाकरे मोठी व्यूहरचना आखत असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे विद्यमान आमदार असून त्यांच्याविरोधात आता ठाकरे गटाकडून केदार दिघे निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. (Uddhav Thackeray )

केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, येथे माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो. आज महाविकास आघाडीकडून उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात आता ही जागा नेमकी कुणाला मिळणार, त्याकडे सर्वांचं लक्ष राहील.

ठाण्यात उद्धव ठाकरेंचा मोठा डाव

एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असणाऱ्या आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिंदेंच्या विरोधात रिंगणात उतरवल्यास येथील निवडणूक ही चुरशीची होऊ शकते. असं झाल्यास, कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी दिघे विरुद्ध शिंदे असा सामना होऊ शकतो.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत, भरत गोगावले या बड्या नेत्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत एकूण 49 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (Uddhav Thackeray )

News Title : uddhav thackeray big step against cm shinde

महत्वाच्या बातम्या –

अखेर ठरलं! मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागांवर लढणार?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, राज’पुत्र’ अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

आज सिद्धी योगात 12 पैकी ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव!

“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!

Join WhatsApp Group

Join Now