मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

On: March 14, 2023 11:37 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करताना काही कारण दिले असले तरी ‘ईडी’ पासून संरक्षण मिळण्यासाठीच ‘हा’ उद्योग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममध्ये काम केलं होतं, तसंच ते 2014 च्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये आणि महाविकासआघाडी सरकारमध्येही उद्योगमंत्री होते. विधान परिषदेचे आमदार असलेल्या सुभाष देसाई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेने त्यांना पुन्हा आमदारकी दिली नाही.

सुभाष देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांचा मुलगाच शिंदेंकडे जात असल्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now