“मर्दाची अवलाद असेल तर…”; उद्धव ठाकरे भडकले

On: November 11, 2023 7:12 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुंब्रा दौऱ्यावर असातना, मोठा राडा पाहायला मिळाला. मुंब्रा इथल्या ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा घेत,त्यावर बोलडझर फिरवल्याचा आरोप आहे. याच शाखेच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मुंब्रा इथं दाखल झाले. मात्र या शाखेकडे जाण्यापासून उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी रोखलं. यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील बघा. मुंब्र्याच्या शाखेची (Mumbra Shakha) कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉजिट जप्त करुन त्यांना घरी पाठवा. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

नेभळटांनो, हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या. मर्दाची अवलाद असेल तर या आणि भिडा, आमची तयारी आहे, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यावेळी राडा

शाखेच्या पाहणीसाठी उद्धव ठाकरे मुंब्रा इथं दाखल झाले.मात्र या शाखेकडे जाण्यापासून उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी रोखलं. उद्धव ठाकरे गाडीतून उतरुन थेट बॅरिकेट्सजवळ पोहोचले. यावेळी शाखेजवळ प्रचंड राडा पाहायला मिळाला.

पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेकडे न जाण्याचं आवाहन केलं, पण ठाकरेंनी त्या शाखेत नेमकं काय झालंय हे पाहण्याची विनंती केली. यावेळी ठाकरेंचे खासदार संजय राऊत, राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. पोलिसांनी उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेपासून काही अंतरावर थांबवण्यात आला.

थोडक्यात बातम्या- 

मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!

‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!

“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”

पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now