‘मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करून गद्दारांचं नाव लिहीलं’

On: April 24, 2024 12:47 PM
Udddhav Thackrey Slams Narendra Modi And Eknath Shinde
---Advertisement---

Udddhav Thackrey | लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यात प्रचारसभांचा धडाडा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. सध्या नांदेड दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी   मोदी सरकार आणि शिंदे गटावर निशाणा साधत टीका केली.

यावेळी त्यांनी पार्थ पवार यांना मिळालेल्या सुरक्षेवरूनही सरकारला घेरलं. घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. पण सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. या  सुरक्षेचा खर्च कोण करतंय?, असा सवालही यावेळी ठाकरेंनी केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘राज्यात महिला सुरक्षित नाही, तिथे सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहे. सुरक्षेचा खर्च कोण करतंय?,लोकांकडून कर घेऊन गद्दारांना सुरक्षा दिली जात आहे.’, असा आरोप उद्धव ठाकरे (Udddhav Thackrey ) यांनी केला आहे.

तसंच पुढे त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.मोदी सरकारने संकटाच्या काळात साथ देणाऱ्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरचं नाव बदललं, तेथे उपऱ्यांच, गद्दारांचं नाव लिहीलं. उद्या ते आमच्या सातबाऱ्यावरचं नाव बदलतील. त्यांनी खाडाखोड करून गद्दारांचं नाव टाकलं. उद्या आमचा सातबारा खोडला आणि उपऱ्यांचं नाव लिहिलं तर आम्ही काय करणार ? अशी भीती लोकांच्या , शेतकऱ्यांच्या मनात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्हाला ते नकली म्हणत असतील तर आम्हाला ते नकली शेतकरी म्हणतील. आम्ही कुणाकडे दाद मागायची असा सवाल शेतकरी करत होते, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.देशात हुकूमशाही विरोधात लाट उसळली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला कर्ज मुक्त केलं होतं, असं शेतकरी स्वतःहून सांगत आहेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

सुरतमध्ये जादू झाली आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध जिंकला. ही अशी जादू झाली तर सर्वसामान्य काय करणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे. विरोधी पक्षाचे 150 खासदार अधिवेशनात रद्द करून काही कायदे मनमानीपणे मंजूर करून घेतले. हम करे सो कायदा. असं म्हणत उद्धव ठाकरे (Udddhav Thackrey ) यांनी संताप व्यक्त केला.

News Title : Udddhav Thackrey Slams Narendra Modi And Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

अप्पी आमची कलेक्टर मालिकेला धक्कादायक वळण, अर्जुनला सोडून जाणार अप्पी?

दुबईत संगीत सेरेमनी तर लंडनमध्ये सातफेरे, ‘असा’ होणार राधिका-अनंत अंबानीचा शाही विवाह सोहळा

शुभमन गिल सारासोबत ब्रेकअप करून ‘या’ तरुणीच्या प्रेमात दंग

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळीचा तडाखा बसणार, हवामान विभागाचा इशारा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाईक घ्यायची? तर भन्नाट फीचर्ससह ‘ही’ नवीन बाईक येतेय बाजारात

Join WhatsApp Group

Join Now