‘ …त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं

On: December 3, 2022 1:19 PM
---Advertisement---

रायगड | छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले हिरो झाले आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं, त्यांच्या विरोधात खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी रायगडावर जाऊन आक्रोश आंदोलन केलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी शिवप्रेमींना संबोधित करताना भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

ज्यांनी सर्वधर्माचा आदर करण्याचा संदेश महाराजांनी दिला. त्याच व्यक्तीचा राज्यात विटंबना होत आहे. चित्रपट असेल, लिखान असेल आणि वक्तव्य असेल. पण सगळे जण शांतपणे बसले आहे. नंतर सांगता अप्रत्यक्षपणे बोलल्याचं सांगता, त्यांचं समर्थन करण्याचे धाडस करताय, पण कोण कुठं गेलं, काय गेलं याला अर्थ नाही, हे अजिबात सहन केले जाणार नाही, असं उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं आहे.

आपण मुग गिळून गप्प बसलो आहे. यावर आपण काही प्रतिक्रिया देत नाही, आता आपण प्रतिक्रियावादी झालो आहे, हे देशासाठी घातक आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

कोणता प्रोटोकॉल? चुकीचं हे चुकीचं आहे. हे लोक जर समर्थन करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असं आव्हानच त्यांनी यावेळी केलं आहे.

शिवरायांनी सर्वधर्मीयांना एकत्र येण्याचा संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाचं काम आहे. शिवरायांनी आपलं आयुष्य राज्यासाठी वेचलं. त्यांचा अवमान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. शिवरायांना वंदन करायचं पण त्यांनी दिलेल्या सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला जात नाही. राजकीय पक्षांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे, अशी टीका उदनयराजेंनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now