उरलेले आमदारही सोडणार ठाकरेंची साथ?; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

On: December 16, 2022 4:43 PM
Uddhav Thackery
---Advertisement---

मुंबई | शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackery) टेंशन वाढल्याचं दिसतंय. कारण ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसतंय.

10 ते 15 आमदार (Mla) आमच्या संपर्कात आहेत. जरी सरकार पाडण्याच्या आणि निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या तरी मी असं सांगितलं होतं की 170 हा आमचा बहुमताचा आकडा आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

आणखीन 10 ते 12 लोक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 180 ते 182 पर्यंत जाऊ शकतो. नवीन वर्षांत तुम्हाला नव्या घडामोडी काय आहेत ते कळेल, असा थेट दावा उदय सामंत यांनी केला आहे.

दरम्यान, खरा धमाका पाच महिन्यांपूर्वी झाला त्याचे पडसाद नवीन वर्षात उमटतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

उदय सामंतांच्या दाव्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ झाली आहे. उदय सामंत यांनी कोणत्या पक्षाचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख ठाकरे गटाकडे होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now