‘लवकर ये बाबू…’; उबर ड्रायव्हरचा महिलेला अश्लील मेसेज, धक्कादायक घटना समोर

On: January 29, 2025 10:41 AM
Uber Moto safety rules
---Advertisement---

Uber Driver l एका उबर ड्रायव्हरने (Uber Driver) महिला प्रवाशाला (Female Passenger) अश्लील मेसेज (Obscene Message) पाठवल्याची घटना समोर आली आहे.

दिल्लीतील (Delhi) वकील (Lawyer) तान्या शर्मा (Tanya Sharma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. या घटनेमुळे कॅबमधील (Cab) महिलांच्या सुरक्षेचा (Women Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तान्या शर्मा यांनी उबरमधून कॅब बुक केली होती आणि ड्रायव्हरला कळवले होते की त्यांना तयार होण्यासाठी ५ मिनिटे लागतील. त्यानंतर लगेचच तान्या यांना ड्रायव्हरकडून आक्षेपार्ह मेसेज आले. “जल्दी आओ बाबू यार, मन हो रहा है,” असा मेसेज ड्रायव्हरने पाठवला होता. या मेसेजचे स्क्रीनशॉट (Screenshot) तान्या यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.

तात्काळ कॅब रद्द, ड्रायव्हरवर कारवाईची मागणी

मेसेज मिळाल्यानंतर तान्या यांनी ताबडतोब कॅब रद्द केली आणि या ड्रायव्हरविरुद्ध तक्रारही (Complaint) दाखल केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी उबरला (Uber) टॅग (Tag) करत अशा बेजबाबदार ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Uber Driver l महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा चर्चा

तान्या शर्मा यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर कॅबमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेक महिलांनी आपले असेच अनुभव शेअर करत कॅबमधील प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

उबर ड्रायव्हरने महिला प्रवाशाला अश्लील मेसेज पाठवला. दिल्लीतील वकील तान्या शर्मा यांनी सोशल मीडियावर अनुभव शेअर केला. तान्या यांनी कॅब रद्द करून ड्रायव्हरविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे कॅबमधील महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह.

News Title: Uber-Driver-Sends-Obscene-Message-to-Female-Passenger-Lawyer-Tanya-Sharma-Shares-Experience-on-Social-Media

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now