Rupali Chakankar | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविरोधात समाज माध्यमांवर (Social Media) आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट (Offensive Post) केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार कारवाई करत पोलिसांनी आता दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (Information Technology Act) 67A अंतर्गत मुंबई सायबर (Mumbai Cyber) येथे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अटकेत
याप्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या (Mohol Police Station) हद्दीतून ताब्यात घेण्यात आले, तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन (Uruli Kanchan), जि. पुणे (Pune) येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना आज गिरगाव (Girgaon) येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात (Metropolitan Court) हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. (Rupali Chakankar)
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील (Facebook) “राजकारण महाराष्ट्राचे” (Rajkaran Maharashtrache) या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर अविनाश पुकळे आणि आकाश डाळवे यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
Title : Two Arrested for Offensive Posts Against Rupali Chakankar






