शारीरिक संबंधाबाबत अभिनेत्री ट्विंकल खन्नाचं धक्कादायक वक्तव्य, बॉलिवूडमध्ये खळबळ

On: October 23, 2025 2:30 PM
---Advertisement---

Twinkle Khanna | अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि काजोल (Kajol) सध्या त्यांच्या ‘टू मच’ (Too Much) या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात करण जोहर (Karan Johar) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पाहुणे म्हणून आले होते. यावेळी चौघांनी शारीरिक आणि भावनिक फसवणुकीवर (Cheating) चर्चा केली, ज्यादरम्यान ट्विंकलने केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शारीरिक फसवणूक की भावनिक?

चर्चेदरम्यान, जान्हवी कपूरने स्पष्ट केले की तिच्यासाठी शारीरिक फसवणूक (Physical Cheating) अत्यंत गंभीर असून त्यामुळे नाते तुटू शकते. याउलट, करण जोहरचे मत होते की शारीरिक फसवणूक ही फार मोठी गोष्ट नाही.

करणच्या मताला दुजोरा देत ट्विंकल खन्ना हसून म्हणाली, “आम्ही पन्नाशीत आहोत… जान्हवी विशीत आहे, ती लवकरच आमच्यात येईल. तिने अजून ते पाहिलं नाही जे आम्ही पाहिलंय. ‘रात गयी, बात गयी’ (जे झालं ते झालं).” तिच्या या विधानावरून असे सूचित होत होते की वयाच्या एका टप्प्यानंतर शारीरिक फसवणूक माफ केली जाऊ शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. काजोलनेही शारीरिक फसवणुकीपेक्षा भावनिक फसवणूक (Emotional Cheating) अधिक गंभीर असल्याचे मत मांडले.

Twinkle Khanna | लग्नात प्रेम महत्त्वाचे की सुसंगतता?

शोमधील ‘दिस ऑर दॅट’ सेगमेंटमध्ये लग्नात प्रेम (Love) की सुसंगतता (Compatibility) काय जास्त महत्त्वाचे आहे, असा प्रश्न विचारला गेला. यावेळी ट्विंकल आणि जान्हवीने प्रेमाला प्राधान्य दिले, तर काजोल आणि करण यांनी सुसंगततेशिवाय प्रेम टिकू शकत नाही, असे मत मांडले.

काजोल म्हणाली, “जर पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा नसेल, तर प्रेम जास्त काळ टिकत नाही.” करणनेही तिच्या मताला दुजोरा दिला. वैयक्तिक आयुष्यात, ट्विंकलने २००१ मध्ये अक्षय कुमारशी (Akshay Kumar) लग्न केले, तर काजोलने १९९९ मध्ये अजय देवगणसोबत (Ajay Devgn) लग्न केले. काजोलने एका मुलाखतीत तिच्या यशस्वी लग्नाचे रहस्य सांगताना म्हटले होते की, “मी अर्ध ऐकायला आणि अर्ध विसरून जायला शिकले. सर्वकाही मनावर न घेणे महत्त्वाचे आहे.”

News Title- Twinkle Khanna’s Controversial Cheating Take

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now