ट्विंकल खन्नाचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध?, अखेर ट्विंकलने सोडलं मौन म्हणाली…

On: April 22, 2024 11:56 AM
Twinkle Khanna
---Advertisement---

Twinkle Khanna | ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आहे. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरीही नेहमी चर्चेत असते. ती आपल्या सोशल साईटवर नेहमी महत्त्वाच्या अपडेट्स देत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ट्विंकल खन्नाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत चांगले संबंध असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर अभिनेत्री ट्विंकलने (Twinkle Khanna) मौन सोडलंय.

ट्विंकल खन्ना आणि दाऊद इब्राहिम यांचे खास संबंध असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता स्वत: ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) म्हणाली, “मी न्यूज चॅनेलवर माझ्या नावाचं टीकर पाहिलं आहे. मी दाऊदसाठी काम केलं असल्याचं त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. दाऊदने माझ्याहून अधिक चांगल्या डान्सर्स पार्टीमध्ये बोलावल्या असतील. पण हे फेक न्यूजचं जग आहे.”

ट्विंकल आणि दाऊदच्या नात्यावर अक्षय कुमार म्हणाला…

2010 मध्ये अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाचे दाऊदसोबतचे नातेसंबंध नाकारले. दाऊद इब्राहिमने दुबईमध्ये पार्टी आयोजित केली होती, तेव्हा त्या पार्टीला ट्विंकल खन्ना गेली अशा समोर येणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं अक्षय कुमार म्हणाला.

अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना या दोघांनी 2001 मध्ये विवाह केला. त्यानंतर त्यांना दोन मुलं देखील आहेत. मुलाचं नाव हे आरव असून मुलीचं नाव हे नितारा आहे. अक्षय कुमारला अनेकदा कुटुंबासोबत स्पॉट केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय.

ट्विंकलने ‘सीनू’, ‘बादशाह’, ‘जोरू का गुलाम’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

ट्विंकल खन्ना अभिनेत्रीच नाहीतर उत्तम लेखिका

ट्विंकन खन्ना ही एक अभिनेत्री नाहीतर उत्तम लेखिका देखील आहे. 2015 मध्ये ट्विंकलचं पहिलं पुस्तक ‘मिसेज फनीबोन्स’ प्रकाशित झालं. तसेच ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद ‘हे पुस्तक प्रकाशित झालं. तिसरं पुस्तक  ‘पजामास आर फॉरगिविंग’ आणि चौथं ‘वेलकम टू पॅराडाइज’ नावाचं पुस्तक आहे.

News Title – Twinkle Khanna Explain About Dawood And Her Connection

महत्त्वाच्या बातम्या

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”

Join WhatsApp Group

Join Now