मालिका विश्वात शोककळा! अभिनेत्री संचिता उगालेनं उचललं टोकाचं पाऊल; संपवलं जीवन

On: June 15, 2026 1:45 PM
Sanchita Ugale Passes Away
---Advertisement---

Sanchita Ugale Passes Away | वसई (Vasai) परिसरातील नालासोपारा (Nalasopara) येथून मनोरंजनविश्वाला हादरवणारी घटना समोर आली आहे. हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगाले (Sanchita Ugale) हिचे तिच्या राहत्या घरी निधन झाले आहे. या घटनेनंतर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून, तिच्या निधनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस तपासात कारणांचा शोध :

प्राथमिक माहितीनुसार, नालासोपारा येथील निवासस्थानी संचिताचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आचोले पोलीस ठाणे (Achole Police Station) येथील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. संचिताने हे टोकाचे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक, व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही कारणांबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून, पोलीस संबंधित व्यक्तींची चौकशी करून घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत.

Sanchita Ugale Passes Away | मनोरंजनविश्वातून शोक व्यक्त :

संचिता उगाले ही हिंदी दूरचित्रवाणी क्षेत्रातील ओळखला जाणारा चेहरा होती. विविध मालिकांमधील तिच्या अभिनयामुळे तिने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सामाजिक माध्यमांवरही तिची मोठी लोकप्रियता होती. इन्स्टाग्राम (Instagram) या प्लॅटफॉर्मवर तिचे सुमारे १ लाख ४० हजार फॉलोअर्स होते. (Sanchita Ugale Passes Away)

तिच्या अकाली निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील सहकारी कलाकार, मित्र आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर करिअर घडवत असलेल्या एका तरुण अभिनेत्रीच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, तिच्या मृत्यूमागील कारणांबाबत अधिकृत माहिती समोर येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

News title : TV Actress Sanchita Ugale Passes Away

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now