तुळस लावण्याची योग्य दिशा आणि महत्त्व, ‘या’ चुका टाळा!

On: March 13, 2025 12:32 PM
tulsi
---Advertisement---

Tulsi | हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मात्र, तुळशीच्या रोपाची योग्य काळजी घेतली नाही तर उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुळशीच्या रोपाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आणि नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

घरात सकारात्मक ऊर्जा वाढते-

वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं (Tulsi) रोप योग्य दिशेला लावल्याने घरात शांती आणि आनंद राहतो. तुळस उत्तर (North) किंवा ईशान्य (Northeast) दिशेला लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वास्तुदोष टळतो. तसेच, घराच्या अंगणात तुळस लावणेही शुभ मानले जाते, कारण ते स्थान ब्रह्मस्थान आहे.

तुळशीचं रोप दक्षिण (South) किंवा आग्नेय (Southeast) दिशेला लावू नये. हे अग्नीचे स्थान मानले जाते आणि याठिकाणी तुळस लावल्याने कुटुंबात वाद आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य दिशेची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुळशीच्या रोपासाठी घ्यायची काळजी-

तुळशीच्या (Tulsi) रोपाला दुधात मिसळलेलं पाणी अर्पण करू नये. असे केल्याने रोप लवकर सुकते आणि घरात अडथळे निर्माण होतात. बेलाची पाने, आकडे किंवा धोतऱ्याची फुले तुळशीला अर्पण करू नयेत, कारण यामुळे तुळस माता रागावते. तिळाचे किंवा मोहरीचे तेल चुकूनही तुळशीच्या रोपावर पडू देऊ नये.

तुळशीच्या रोपावर काजळ किंवा कोणत्याही अशुद्ध वस्तू टाकू नयेत. यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुळशीचं रोप चौकोनी आकाराच्या कुंडीत लावावं आणि नेहमी सूर्यप्रकाशात ठेवावं. रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

News Title : Tulsi Plant Vastu Tips Avoid These Mistakes

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now